शुंगारतळी – गुहागर तालुक्यातील काळसूर कौंढर येथील युवा नेते रमिझ लालु यांनी आगामी पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद निवडणूक लढवावी अशी मागणी किंवा असा आग्रह आदर्श युवा मंच यांच्या कडून केला जात आहे.
काळसूर कौंढर येथील युवा नेते रमिझ लालु हे उच्चशिक्षित असून ते दोन वर्षापूर्वी आपल्या मूळ गावी आले या आधी ते व्यवसायानिमित्त ते परदेश तसेच नाशिक या ठिकाणी होते गुहागर तालुक्यामध्ये त्यांनी अनेक क्रिकेट प्रेमींना व खेळाडूंना एकत्र करीत आदर्श युवा मंचच्या व्यासपीठाखाली तालुक्यात अनेक उपक्रम राबवले त्यामध्ये प्रामुख्याने गुहागर मधील क्रिकेट खेळाडूंसाठी गुहागर प्रीमियर लीग क्रिकेट ही स्पर्धा गेली दोन वर्ष उत्तम नियोजन करून पार पाडली या वेळेला तालुक्यातील सर्वच खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ मिळाले आणि नाही रमीझ लालु चर्चेत आले. रामिझ हे लतिफ लालू यांचे सुपुत्र असून त्यांचे वडील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक सेल गुहागर तालुक्याचे अध्यक्ष आहेत. त्यांचाही जनसंपर्क दांडगा असून या समाजकार्यातून त्यांच्या मुलाने राजकारणात उतरावं अशी मागणी आदर्श युवा मंचचे अनेक कार्यकर्ते करत आहेत. त्यामुळे आगामी काळात रमिझ हे काय निर्णय घेतात यावरच संपूर्ण राजकीय गणित अवलंबून असेल.
उच्चशिक्षित असलेले रमिझ लालु हे जर राजकारणात आले तर तालुक्यातील अनेक विकासकामांना गती मिळेल अशी चर्चा युवकांमध्ये आहे.रमिझ लालु हे मनमिळावू असल्याने त्यांनी राजकारणात यावं अशीच आशा आता युवक वर्ग व्यक्त करीत आहे.