चिपळूण- चिपळूण येथील सायकलिंग क्लब मार्फत राज्यस्तरीय सायकल स्पर्धेचे महाराष्ट्रदिनी ( दि.०१ मे ) रोजी आयोजन करण्यात आले आहे. राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय आणि महिला अशा तीन गटात एकूण ९० हुन अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे.
सायकल स्पर्धेचे सर्व नियोजन चिपळूण सायकलिंग क्लब आणि क्लबचे सदस्य करत आहेत यात क्लब तर्फे सर्व स्पर्धेकांची राहण्याची, जेवणाची, नाष्ट्याची सोय करण्यात आली आहे. स्पर्धेचे प्रमुख आकर्षण महाराष्ट्र आणि भारतातील सायकलिंग टीम मधील काही खेळाडू यात सहभागी होत आहेत तसेच एकूण १५ वेगवेगळ्या शहरातून या स्पर्धेला स्पर्धक लाभलेले आहेत त्यामुळे अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र दिनी पहाटे ५.३० वाजता बहादूर शेख नाका येथे सुरुवात होणार आहे. स्पर्धेचा शेवटचा थरार आपल्याला कुंभार्ली घाट माथा व सोनपात्रा जवळ सकाळी ७.१० पर्यत बघायला मिळेल. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सकाळी १०.३० वाजता माधव सभागृह चिपळूण येथे संपन्न होणार आहे. स्पर्धा पहायला येणाऱ्या हौशी नागरिकांनी चारचाकी वाहन आणू नये दुचाकी वाहनाने स्पर्धा पहायला यावे.जेणेकरून घाटात वाहतूक कोंडी होणार नाही. स्पर्धकांना सायकल चालवायला रस्ता मोकळा राहील अशी सूचना आयोजकांकडून करण्यात आली आहे.