चिपळूण- कोकणातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने दुग्ध प्रकल्पाच्या माध्यमातून काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, चिपळूण नागरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव विशेष म्हणजे सुभाष चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही सगळी व्यवस्था उभी राहात आहे. कोकणामध्ये या पद्धतीची हिम्मत करण्याची भूमिका कोणी दाखवली नाही. ही या तिघांनी दाखवली असून या तिघांना सलाम करतो, तुमच्या हिमतीला दाद देतो, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वाशिष्टी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सच्या ईटीपी प्लांट भूमिपूजन समारंभ प्रसंगी या तिघांचे भरभरून कौतुक केले.
निसर्गाने कोकणाला भरपूर दिले आहे. पण निसर्गाचा वापर आपण मानवी जीवनाच्या कल्याणासाठी योग्य पध्दतीने केला असता तर आम्हाला मुंबईला नोकरी-धंद्यासाठी जावे लागले नसते.कोकणात भरपूर पाऊस पडत आहे. पण सर्व पाणी समुद्राला जाऊन मिळत आहे. गोव्यासारख्या छोट्या राज्यातील निसर्ग बघण्यासाठी जगातून लोकं येतात. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे काही समुद्रामध्ये आहेत. ते देशातल्या कुठल्याही समुद्रात नाही. या जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ झालं असतं तर आपल्याला वाटते की, रत्नागिरी जिल्ह्याच्या लोकांना मुंबईत काम करायला जायची गरज पडली नसती.कोकणातील नैसर्गिक व्यवस्थेला जोडून व्यवस्था उभी करायला पाहिजे होती. त्याच्यामध्ये आम्ही मागं पडलो, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले. पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे कोकणात डेअरी प्रकल्प यशस्वी होऊ शकला नाही. दुग्ध व्यवसायात शेतकरी मागे पडला. यात काही कारणे असतील. मात्र, आता येथील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, चिपळूण नागरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव आणि विशेष करून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही सगळी व्यवस्था निर्माण होत आहे. कोकणामध्ये या पद्धतीची हिम्मत करण्याची भूमिका कोणी दाखवली नाही. ही सुभाष चव्हाण, प्रशांत तसेच स्वप्ना या तिघांनी दाखवली आहे. याबद्दल तुम्हा तिघांना सलाम करतो, तुमच्या हिमतीला दाद देतो, अशा शब्दांत नाना पटोले यांनी या तिघांचे भरभरून कौतुक केले.
वाशिष्टी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सच्या ईटीपी प्लांट चे भूमिपूजन पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, चिपळूण पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चव्हाण, वाशिष्टी मिल्क प्रोडक्टचे प्रमुख व चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, आमदार शेखर निकम, संचालिका स्मिता चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव आदींच्या उपस्थितीत थाटामाटात भूमिपूजन झाले.