खेड ; भरणे काळकाई देवीचे भक्त निवास २३ पासून भक्तांच्या सेवेत

0
115
बातम्या शेअर करा

खेड- खेड भरणे येथील श्री काळकाई देवीच्या दर्शनासाठी दूरवरून येणाऱ्या भक्तांच्या निवासाची सोय म्हणून श्री देवी काळकाई मंदिर विश्वस्त मंडळाने सर्व सोयींनी युक्त भक्त निवासाची उभारणी केली आहे. या भक्त निवासाचे २३ फेब्रुवारी रोजी उद्घाटन होणार आहे. याचवेळी कलशारोहणासह रूग्णवाहिकेचेही लोकार्पण करण्यात येणार आहे.२ दिवस धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असल्याची माहिती अध्यक्ष सचिन जाधव, सेक्रेटरी सुजित शिंदे यांनी दिली.

२३ रोजी पहाटे ५ वा. काकड आरतीनंतर ८ ते १०.३० यावेळेत कलश व देवीची सवाद्य मिरवणूक, ११ वा. भक्त निवास महापूजा व होमहवन झाल्यानंतर भक्त निवासाचे उद्घाटन होईल. याप्रसंगी आमदार योगेश कदम, उपविभागीय अधिकारी राजश्री मोरे, तहसीलदार प्राजक्ता घोरपडे, पोलीस निरीक्षक निशा जाधव, श्री देवी काळकाई मंदिरचे अध्यक्ष सचिन जाधव, पंचायत समिती सभापती मानसी जगदाळे, भरणे सरपंच संदीप खेराडे उपस्थित
राहणार आहेत.

यानंतर आरती, तिर्थप्रसाद व महाप्रसाद, महाआरती व
सायंकाळी ७ वा. तालुका वारकरी सांप्रदायाचे हरिपाठ होईल. रात्री ८ वा. सत्कार समारंभ होईल. याप्रसंगी खासदार सुनील तटकरे, माजी आमदार संजय कदम,
मनसेचे ठाणे विभाग जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, मनसेचे राज्य सरचिटणीस तथा नगराध्यक्ष वैभव खेडेकर उपस्थित राहणार आहेत. रात्री ८.३० वा. हभप शिवलिला पाटील यांचे कीर्तन होईल.

२४ रोजी पहाटे ५ वा. काकड आरती, कलश पूजन, होमहवन, मंदिरावर कलश चढवणे आदी धार्मिक कार्यक्रम होतील. ११ वा. रूग्णवाहिका लोकार्पणासाठी मुंबई- मंडणगडचे समाजसेवक महेश गणवे उपस्थित राहणार आहेत. यानंतर आरती, महाप्रसाद, महाआरती, हरिपाठ होईल. रात्री ८ वा. सत्कार समारंभ होणार असून माजी ऊर्जामंत्री अनंत गीते, माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम, आमदार योगेश कदम, श्री स्वामी समर्थ भक्त परिवार व हिंदुराज मित्रमंडळाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. रात्री ८.३० वा. ठाणे येथील जगदीश पाटील यांचा ऑर्किस्ट्रा होईल.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here