गुहागर – गुहागर तालुक्यातील आबलोली- मासू मार्गावर चिरे वाहून नेणारा टेम्पो डोंगर उतारावर कोसळला. या अपघातात चिरे अंगावर पडून तीन मजूर जखमी झाले आहेत. त्यापैकी दिनेश बनवासी या मजुराचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित दोन मजुरांची प्रकृती स्थीर आहे. शिवसेना तालुकाप्रमुख सचिन बाईत आणि आबलोली शाखा प्रमुख संदिप निमुणकर अपघात झाल्यावर तातडीने पोहोचून मदतकार्य केले.
स्थानिक ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार मासुमधून चिरे भरुन टेम्पो (क्र.MH04-CU-5847) आबलोलीच्या दिशेने येत होता. चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो रस्त्यासोडून डोंगर उतारावर पलटी झाला. टेम्पो उतारावर ७ ते ८ फूट खोल घसरत गेला. यावेळी टेम्पोत दिनेश बनवासी, अस्लम खान राधेश्याम बील हे चिरेखाणीवरील ३ मजूर होते. अपघातात टेम्पोतील चिरे या तिनही मजुरांच्या अंगावर पडले. चालक किरकोळ जखमी झाला.
शिवसेना तालुका प्रमुख सचिन बाईत आणि आबलोलीचे शाखाप्रमुख संदिप निमुणकर यांनी जखमींना उपचारासाठी रत्नागिरी येथे पाठवले यावेळी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेला दिनेश बनवासी या चिरेखाण मजुराचा मृत्यू झाला आहे.
ही चिरेखाण आबलोली येथील संदेश काजरोळकर यांच्या मालकीचे असून गाडी मध्ये प्रमाण जास्त चिरा भरला होता अशी चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे.