गुहागर – एकीकडे अनेक जण शासकीय जमिनीवर अतिक्रमण करताना दिसतात मात्र गुहागर तालुक्यातील पालशेत येते चक्क समुद्रातच अतिक्रमण केल्याचा प्रकार समोर आल्याने राज्याची सुरक्षितता धोक्यात आल्याची चर्चा सध्या गुहागर तालुक्यासह पालशेत परिसरात सुरु आहे.
पालशेत येथील आंबोशी परिसरातील समुद्रकिनारी एका स्थानीक ग्रामस्थ यांनी झोपडी सदृश्य ठिकाण बांधून या ठिकाणी अतिक्रमण केल्याचे दिसत आहे. या ठिकाणी ती व्यक्ती वास्तव्यास असून समुद्र भरतीचे पाणी अनेक वेळा त्या झोपडीमध्ये शिरत आहे. याबाबत स्थानिकांनी त्या ग्रामस्थांना विचारला असता मला महाराष्ट्र बंदर विभागाने परवानगी दिली असल्याचे तो दमदाटी करून सांगतोय. याबाबत गावातील अनेक जणांनी महसूल विभाग ,तलाठी ,ग्रामसेवक यांच्यासह तहसील कार्यालय गुहागरमध्ये तक्रार केली आहे. मात्र असं असतानाही अद्यापही या समुद्रात अतिक्रमण केलेल्या झोपडीवर कारवाई न झाल्याने प्रश्नचिन्ह आणि शंका उपस्थित होत आहेत. तरी महाराष्ट्र बंदर विभागाने या समुद्रात बांधलेला झोपडीवर कारवाई करून या परिसरात अतिक्रमण होणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत.