गुहागर – गुहागर तालुका प्रेस क्लब, गुहागर या संस्थेतर्फे आज पत्रकार दिन समारंभ पाटपन्हाळे ग्रामपंचायत मधील श्री शिवछत्रपती सभागृहात संपन्न झाला. दर्पणकार बाळ शास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रेस क्लबचे अध्यक्ष दिनेश चव्हाण यांनी सर्वाचे स्वागत केले. यावेळी प्रेस क्लबच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
गुहागर तालुका प्रेस क्लब गुहागर या संस्थेतर्फे विशेष गौरव समारंभात गुहागर तालुक्यातील शृंगारतळीमधील नामवंत उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते नासिम मालाणी यांच्या सामाजिक मदत कार्याच्या मौलिक योगदानामुळे सन्मानचिन्ह ,गौरवपत्र ,शाल व पुष्पगुच्छ प्रदान करून “गुहागर गौरव”पुरस्काराने सन्मानित करण्यात आला..तसेच सामाजिक कार्यकर्ते, रक्तदानाच्या श्रेष्ठ व गौरवदायी कार्यामध्ये अग्रेसर असणारे आबलोली मधील विद्याधर उर्फ आप्पा राजाराम कदम यांना सन्मानचिन्ह ,गौरवपत्र ,शाल व पुष्पगुच्छ प्रदान करून “जीवनदाता “पुरस्काराने गौरविण्यात आले.
शृंगारतळीमधील नामवंत उद्योजक ,सामाजिक कार्यकर्ते गुलाम तांडेल तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे व मदतीचे सहकार्य करणारे व शृंगारतळीमधील सामाजिक कार्यकर्ते अरुण गांधी तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सखी व स्वयंसिद्धा पुरस्कार संपादन केलेल्या महिला सुरक्षा संघटना महाराष्ट्र या संस्थेच्या गुहागर तालुकाध्यक्षा व वात्सल्य समितीच्या गुहागर तालुका सदस्य म्हणून कार्यरत असणाऱ्या सौ.पारिजात पराग कांबळे, सामर्थ्य सेवा संस्थेतर्फे विविध उपक्रम व कार्यक्रम राबवून सामाजिक सेवाव्रत करणाऱ्या निगुंडळच्या सौ. प्रज्ञा धामणस्कर – ताम्हणकर व न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे या विद्यालयातील विद्यार्थिनी कु. समृद्धी सुरेश आंबेकर हिने मार्गताम्हाणे एज्युकेशन सोसायटीतर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त “उत्सव स्वातंत्र्याचा गौरव स्वातंत्र्यवीरांचा” या उपक्रमांतर्गत संपन्न झालेल्या निबंध स्पर्धेत प्राथमिक गटात प्रथम क्रमांक संपादन केल्याबद्दल व शालेय व विविध आयोजित निबंध, वक्तृत्व, चित्रकला, कथाकथन, चित्रकला आदी स्पर्धांमध्ये सुयश संपादन केल्याबद्दल सन्मान चिन्ह, गौरवपत्र , शाल ,पुष्पगुच्छ प्रदान करून विशेष गौरविण्यात आले. कोरोना ( कोव्हिड – १९) या जागतिक समस्या काळात विविध उपक्रम व कार्यक्रम राबवून सामाजिक कार्य केल्याबद्दल व संघटनेच्या माध्यमातून विविध कार्यक्रम व उपक्रमांनी समाज जागृती व सामाजिक काम केल्याबद्दल गुहागर तालुका सरपंच संघटनेचा गौरवपत्र व पुष्पगुच्छ प्रदान करून गौरव करण्यात आला.पत्रकारितेमध्ये विविध स्तरावर पुरस्कार प्राप्त केलेल्या पत्रकारांमध्ये लक्ष्मीकांत ( पिंट्या ) घोणसेपाटील, गणेश धनावडे, उमेश शिंदे, सुरेश आंबेकर, प्रशांत चव्हाण यांचा शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.तसेच गुहागर तालुका प्रेस क्लब मधील सदस्यांमध्ये दिनेश चव्हाण, गणेश किर्वे, सुरेश आंबेकर, निसार खान, गजानन जाधव, मारुती जाधव, योगेश तेलगडे, विनोद चव्हाण, उमेश शिंदे, अदनान खान, कृष्णकांत साळगावकर, गजानन जाधव, अमोल पोवळे, संदेश कदम, सुभाष जाधव आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला गुहागर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल भोसले , उद्योजक नासीम मालानी,पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे सरपंच संजय पवार , गुहागर तालुका प्रेस क्लब गुहागरचे अध्यक्ष दिनेश चव्हाण, रक्तदाते विद्याराम कदम , उद्योजक गुलामभाई तांडेल, पुरवठा अधिकारी प्रभूदेसाई, आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुरेश आंबेकर यांनी केले.