चिपळूण ; 110 कोरोना रुग्ण सौम्य लक्षणांमुळे होम आयसोलेशनवर

0
165
बातम्या शेअर करा

चिपळूण – नवीन वर्षात डोके वर काढलेल्या कोरोनाने नागरिकांसह आरोग्य विभाग व प्रशासनाचीही चिंता वाढवली आहे . झपाट्याने कोरोचा प्रादुर्भाव फैलावत आहे . सध्या चिपळूण तालुक्यात ११५ रूग्ण बाधित आहेत . सौम्य लक्षणांमुळे त्यातील ११० रुग्ण घरीच ( होम आयसोलेशन ) उपचार घेत आहेत तर कामथे उपजिल्हा रुग्णालयात अवघे पाच रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत . रूग्णालयात उपचार घेणारा एकही रूग्ण सध्या ऑक्सिजन बेडवर नाही .

गेल्या काही दिवसांपासून शहर परिसरासह ग्रामीण भागातही कोरोचा संसर्ग वाढू लागला आहे . गतवर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्याने चिपळूण तालुका हादरवून सोडला होता . साधारणपणे जून महिन्यापर्यंत त्याचा प्रादुर्भाव ठोगाने होता . मात्र जुलैनंतर कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली होती . अगदी महापूर परिस्थितीत मदतीच्या निमित्ताने इतर जिल्ह्यातून हजारो लोक येथे दाखल होऊनही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला नव्हता . डिसेंबर २०२१ अखेरपर्यंत परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात असतानाच आता नव्या वर्षाच्या प्रारंभापासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे . मंगळवारी १ ९ , बुधवारी तब्बल ४० तर गुरुवारी २६ रूग्णांची येथे नोंद झाली आहे . जिल्ह्यात ३१५ रूग्ण संख्या पोहोचलेली असताना त्यामध्ये एकट्या चिपळुणातील बाधितांची संख्या ११५ पर्यंत पोहोचली आहे . रूग्णसंख्येत सध्या चिपळूण तालुका पुढे असल्याचे दिसून येत आहे . रूग्ण संख्या वाढत असली तरी रूग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे सौम्य आहेत . त्यामुळे बहुतांशी रूग्ण घरीच उपचार घेत आहेत . तर पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या सहा परदेशी नागरिकांचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ . ज्योती यादव यांनी दिली .


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here