चिपळूण- केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (यूपीएससी) २०२०चा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या परीक्षेत तालुक्यातील मांडकी येथील प्रथमेश अरविंद राजेशिर्के हा उत्तीर्ण झाला आहे.
आमदार शेखर निकम यांच्यासह सर्व स्तरातून प्रथमेशचे अभिनंदन होत आहे. आ. निकम यांनी प्रथमेशची भेट घेऊन खास कौतुक केले. प्रथमेशचे दहावीपर्यंतचे शिक्षण डेरवण येथील वालावलकर हायस्कूलमध्ये झाले. यानंत त्याने वालचंद कॉलेज सांगली येथून इजिनिअरिंगची पदवी घेतली. एक वर्ष नोकरी करून साठविलेल्या पैशातून त्याने पुणे व दिल्ली येथे राहून तीन वर्षे युपीएससीचा अभ्यास केला. प्रथमेशचे वडील अरविंद बापूसाहेब राजेशिर्के हे भारतीय सैन्यात मेजर होते. गेल्या मे महिन्यात त्यांचे निधन झाले. त्याचे आजोबा ब्रिटिशांच्या काळात शासकीय सेवेत होते. लहानपणापासून युपीएससी परीक्षेत यश मिळवायचे, असा प्रथमेशचा ध्यास होता. त्याला वडिलांचे, सख्खा मावसभाऊ उमेश राजेशिर्के, बहिणी यांचे मार्गदर्शन लाभले.