चिपळूण – चिपळूण शहरात झालेल्या जलप्रलयानंतर शहर तात्काळ स्वच्छ करण्यासाठी तातडीची मदत म्हणून 2 कोटी रुपयांच्या मदत देण्याची घोषणा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. पुरातून सावरत असलेल्या चिपळूण शहराला आणि बाजारपेठेला त्यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. तसेच, खेड शहराच्या दौऱ्यात पूर ओसरल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन चिखल, कचऱा स्वच्छतेसाठी खेड नगर परिषदेला १ कोटींचा निधी देण्याचीही घोषणा त्यांनी केली. म्हणजेच एकूण दोन्ही शहराच्या स्वच्छतेसाठी 3 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे.