चिपळूण – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, शाखा
चिपळूण यांच्याकडून रामपूर व कापरे प्राथमिक आरोग्य केंद्राला 200 हॅन्डग्लोज, 100 मास्क, ऑक्सीमीटर, सॅनिटायझर, व्हिटॅमिनयुक्त गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
कोविड महामारीत शासन यंत्रणा, आरोग्य सेवा, पोलीस यंत्रणा, अनेक सामाजिक संघटना व सेवाभावी संस्था अहोरात्र मेहनत करून कोविड नियंत्रणासाठी झटत आहेत. शिक्षक हे देखील समाजाचे घटक आहेत व आरोग्य सेवेत अनेक जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. ग्रामीण भागात रुग्णाला देवदूत ठरणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र रामपूर व कापरे येथे वरील साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी रामपूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ . निकिता शिर्के, परिचारिका श्रीम.मुजावर व कर्मचारी, कापरे आरोग्य केंद्रातील श्रीम .हुमने सिस्ट ,श्रीम. चिपळूणकर सिस्टर, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ चिपळूणचे कार्याध्यक्ष राजू सोहनी, जिल्हा कार्यकारणी सदस्य रमाकांत पवार, दिलीप बुदर, तालुका उपाध्यक्ष विनोद हुंबरे, पंढरीनाथ धामापूरकर, अशोक निंबरे, रमेश गोसावी, रवींद्र जगधने आदी उपस्थित होते.