तोक्ते वादळाचा खेड तालुक्याला तडाखा; घरांची पडझड; लाखोंची हानी वीजपुरवठा खंडीत

0
204
बातम्या शेअर करा


खेड – खेड तालुक्यातला तोक्ते वादळाने चांगलाचा तडाखा दिला. शनिवारी सायंकाळपासून मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे ग्रामीण भागात अक्षरश: दाणादाण उडाली. विजेच्या तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडीत झाला. रस्त्यात झाडे उन्मळून पडल्याने वाहतुक ठप्प झाली. निगडे, अस्तान, जैतापूर, खोपी, वेरळ, जांबुर्डे, शिर्शि या गावांमध्ये घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली.वीज पुरवठा खंडीत झाल्याने ग्रामीण भाग अंधारात बुडून गेला.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे शनिवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून वादळाची चिन्हे दिसू लागली. ५ वाजता आकाशात काळेकुट्ट ढग जमा झाले आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह धोधो पाऊस कोसळू लागला. या पावसाने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नुकसान केले. रविवारी सकाळी वाऱ्याचा वेग थोडा कमी होता मात्र दुपारी १ वाजल्यापासून चाऱ्याचा वेग वाढायला सुरवात झाली. बघता बघता मुसळधार पाऊसही कोसळू लागला.
सायंकाळी ४ वाजल्यानंतर परिस्थिती आणखीनच बिकट झाली सोसाट्याच्या वान्याने आणि पावसाने अक्षरश: कहर केला. जोरदार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे नागरिकाच्या उरात धडकी भरली, कोरोनापेक्षाही भयंकर परिस्थिती कालच्या वादळामुळे उद्भवली होती.
तहसिलदार कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार निगडे येथील लिला मोहिते, अनुष्का मोरे, आस्तान येथील चंद्रकांत मोरे, जैतापूर येथील गोपीनाथ मोरे, गणपत मोरे, सुरेश गोरे, खोपी येथील मोहन ढेबे बाळाराम बर्गे, भागोजी आखाडे, खोपी छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, वेरळ येथील मनोज कदम, जाबुर्डे येथील हरिश्चंद्र पाते, शिर्शि येथील हनीफ मांडलेकर, हलिमा हमदुले तर रजवेल
येथील विश्वास निकम यांच्या घरांचे पत्रे उडून तसेच भिती कोसळून नुकसान झाले. या व्यतिरिक्त अन्य गावामध्येही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मात्र त्याचा तपशील अद्याप प्राप्त झाला नसल्याने तहसिल विभागाकडून सांगण्यात आले. मात्र कर्मचाऱ्यांनी तालुक्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करायला सुरवात केली असल्याने उद्यापर्यत तालुक्यात झालेल्या संपुर्ण नुकसानीचा तपशिल उपलब्ध होण्याची शक्यता आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here