गुहागर – राज्यात वाढत्या कोरोनाचे प्रमाण पाहता रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस दलामार्फत प्रत्येक तालुक्यातील पोलीस स्टेशन मार्फत एक गाव दत्तक घेऊन त्या गावात आरोग्य तपासणीची मोहीम आखण्यात आली आहे.यावेळी ते गाव पूर्ण कोरोना मुक्त करण्यासाठी संपूर्ण पोलिस यंत्रणा कामास लागली आहे.
गुहागर तालुक्यातील पोलीस निरीक्षक आणि पोलिस कर्मचारी यांनी रानवी हे गाव दत्तक घेऊन या गावातील प्रत्येक घराघरात जाऊन ग्रामस्थांची तपासणी केली यावेळी त्यांच्यासोबत सरपंच ,पोलिस पाटील, ग्रामपंचायत सदस्य ,ग्राम कृती दल हेही सहभागी होते. यावेळी गावातील प्रत्येक घरात जाऊन ऑक्सी मीटरने ऑक्सिजन लेवल आणि थर्मल गणे टेंपरेचर चेक करण्यात आले. यावेळी रानवी गावातील 450 पुरुष आणि 501 स्त्रिया यांची तपासणी करण्यात आली यावेळी गावातील 14 जण हे कोरोना सदृश्य लक्षणे असलेले आढळून आले त्यामधील एका व्यक्तीला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून बाकी 13 जणांना गावातच होम आयसोलेट करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक दीपक कदम तर कॉन्स्टेबल पाटील ,मयेकर ,साळसकर ,चव्हाण हे कर्मचारी उपस्थित होते.