बातम्या शेअर करा

रत्नागिरी – सद्यपरिस्थितीत रत्नागिरी जिल्हयात कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव व वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता महाराष्ट्र शासनाच्या 21 मे 2020 च्या अधिसूचनेनुसार ज्या खासगी हॉस्पीटलमध्ये बेडची सुविधा आहे असे काही खासगी हॉस्पीटल कोविड 19 विषाणू बाधित रुग्णांच्या उपचाराकरिता उपलब्ध करुन घेण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व कोविड 19 अंगीकृत रुग्णालयांनी त्यांच्याकडे दाखल होणाऱ्या व उपचार घेणाऱ्या कोविड 19 रुग्णांना आकारण्यात येणाऱ्या देयकांची तपासणी करण्याकमी सनदी लेखापाल यांची नियुक्ती करुन त्यांच्या मार्फतच रुग्णालयातील सर्व देयकांची तपासणी करुन शासनाने ठरवून अनुज्ञेय दरानुसारच आकारणी करावी. 15 अंगीकृती हॉस्पीटल मधील कोविड पेशंटच्या बिलांच्या तपासणी करिता 10 तपासणी पथके, ज्यामध्ये रत्नागिरी जिल्हयातील लेखाविषयक काम पाहणाऱ्या 28 अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडील 31 ऑगस्ट 2020 रोजीच्या अधिसूचनेमधील परिशिष्ट C नुसार कोविड रुग्णांकडून पुढील दराप्रमाणेच बिलाची आकारणी करावयाची आहे. यामध्ये अलगीकरण कक्षातील रुग्णांकडून प्रतिदिन रु. ४ हजार, व्हेंटीलेटर शिवाय अतिदक्षता कक्ष रु. ७ हजार ५०० तर व्हेंटिलेटरसह अतिदक्षता विभाग रु. ९ हजार रुपये याप्रमाणे आकारणी करावयची आहे.

वरील दरामध्ये समाविष्ठ बाबी

रुग्णांचा तपास करणे, त्यांच्यावर देखरेख ठेवणे, रक्त लघवी, एच.आय.व्ही, काविळ, किडणी संबधित इ. चाचण्या, २D इको, सोनोग्राफी क्ष-किरण चाचणी व इसीजी, २) औषधे, ३) रुग्णाला आवश्यक ऑक्सीजन ४) तज्ञांशी सल्ला मसलत ५) बेड सुविधा ६) नर्सिंग सुविधा ७) जेवण ८) Ryles tube insertion Urinary Tract catheterization संबधित बाबी.

वरील दरामध्ये समाविष्ठ नसणाऱ्या बाबी

१) पीपीई कीट (जास्तीत जास्त रु. 600 प्रति दिन प्रति रुग्ण) व जास्तीत जास्त रु. 1200 अतिदक्षता विभागाकरिता. यापेक्षा अधिकचा खर्च असल्यास त्या संबधिचे स्पष्टीकरण आवश्यक. २) रुग्णांच्या अधिक तपासणी करण्याकरिता उपाययोजना जसे की Central Line Insertion, Chemo port Insertion, Bronchoscope procedures, biopsies,ascetic/pleural tapping हयाचे तुलानत्मक दर 31 डिसेंबर 2019 नुसार असावेत. ३) कोविड चाचणी 31 ऑगस्ट 2020 च्या मार्गदृर्शक सूचनांमधील मुद्दा क्र.९ नुसार प्रत्यक्ष दर. ४) उच्च प्रतीची औषधे जसे इम्युनोग्लोब्युलीन, मेरोपेनेम, रेमेडिसिवीर, फ्लॅविपिरवीर, टोसिलीझुम्यॅब ई. इंजेक्शन व पूरक आहार. ५) उच्च प्रतीची तपासणी जसे की सिटीस्कॅन, एमआरआय, पेट स्कॅन किंवा प्रयोगशाळा चाचण्या कि ज्यांचा चौथ्या कॉलममध्ये समावेश नाही त्यांची तुलानात्मक आकारणी 31 डिसेंबर 2019 रोजी हॉस्पीटल ज्या दराने करत होते त्याच दराने करण्यात यावी, असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रत्नागिरी यांनी कळविले आहे.

      

बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here