खेड ; सुप्रिया कंपनीचे दोन अद्यावत कोविड सेंटर सोमवारपासून होणार सुरू

0
309
बातम्या शेअर करा

चिपळूण -कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता ती आटोक्यात येण्यासाठी लोटे एम आय डी मधील सुप्रिया लाइफसन्स कंपनीचे सोमवार दि 10 मेला लोटे मध्ये दोन अद्यावत कोविड सेंटर सुरू करत आहे त्याचा फायदा लोटे एमआयडीसी व परिसरातील गावांना होऊ शकतो अशी माहिती कंपनीचे मालक सतीश वाघ यांनी दिली कोविड सेंटरसाठी सतीश वाघ यांनी 50 लाखाचे अनुदान दिले आहे त्यामुळे प्रशासनकडून कोतुक होत आहे .
कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून ती आटोक्यात आणण्यासाठी अनेक संस्था पुढे येत आहेत आणि प्रशासनला साथ देत आहेत त्यातच नव्याने लोटे एमआयडीसी मधील सुप्रीया लाइफसन्स कंपनीने पाऊल उचलले आहे खेड मध्ये एक नव्हे तर दोन अद्यावत कोविड सेंटर सुरू होत आहेत
यामध्ये एसएमएस हॉटेल वक्रतुंड येथे व्हेंटिलेटरसह सुसज्ज 30 आयसीयु बेड व मेसम परशुराम हॉस्पिटल ऑक्सिजन पुरवठा असलेल्या 30 बेड घाणेखुंट लोटे येथे सोमवार दि 10 मे पासून सुरू होत आहे सुप्रिया कंपनी सीएसआर अंतर्गत काम करत असून दोन्ही कोविड रुग्णालय एमआयडीसी लोटे आणि आसपासच्या गावासाठी उपयोगी ठरणार आहे. असल्याची माहिती कंपनीचे सर्वेसर्वा सतीश वाघ यांनी दिली.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here