सातारा – (प्रवीण गाडे ) सातारा जिल्ह्यातील अनेक उद्योग, व्यवसाय अडचणीत आले आहेत. त्यामुळे छोट्यामोठ्या व्यावसायिकांसमोर उपासमारीची वेळ आली असून, त्यांच्यासमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. परिस्थिती बदलली नाही तर चोर्यामार्या वाढतील. लोकांच्यात उद्रेकाची भावना आहे. याची दखल घेवून शासनाने सातारा जिल्ह्यातील लॉकडाऊन हटवावा, अशी मागणी भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या दालनात झालेल्या बैठकीत केली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर, जि.प. सदस्या अनिता देशमुख, नगरसेवक अॅड. दत्ता बनकर आदी उपस्थित होते.