आबलोली; आयपीएलच्या धर्तीवर एपीएल स्पर्धचे आयोजन

0
235
बातम्या शेअर करा

आबलोली -गुहागर तालुक्यातील आबलोली येथील पावर हाऊस शेजारील काजरा येथील भव्य मैदानात “खेळा आबलोली गावासाठी आपल्या नावासाठी ” हे टायटल असलेली एपीएल स्पर्धा आयपीएलच्या धर्तीवर मान्यवरांच्या उपस्थितीत 28 पासून आयोजीत करण्यात आली आहे.
एपीएल स्पर्धचे हे दुसरे वर्ष असून यावर्षीही आबलोली गावातील सर्व तरूण खेळाडूंना क्रिकेटचे व्यासपिठ मिळावे म्हणून आबलोली गावातील स्थानिक व मुंबई स्थित (ठाणे , दादर , विरार व पुणे ,आदी भागातील ) तरूण खेळाडूंना एकत्र करून (आबलोली व मुंबई) आबलोली गावासाठी सलग दुस-यावर्षी या स्पर्धचे आयोजन करण्यात आले असून “खेळा आबलोली गावासाठी आपल्या नावासाठी ” या एपीएल स्पर्धत सहा टिमना सहभागी करण्यात येणार असून प्रत्येक टिमची बेस प्राईज ठरविण्यात आली असून प्रथम क्रमांकासाठी आकर्षक चषक व रोख रक्कम 21,000/- रूपये , व्दितीय क्रमांकासाठी आकर्षक चषक व रोख रक्कम 10,000/-रूपये तसेच मालिकावीर , बेस्ट बँटमन , बेस्ट बॉलर अशी आकर्षक चषके ठेवण्यात आली आहेत .आयपीएलच्या धर्तीवर एपीएलहि स्पर्धा अतिशय उल्लेखनीय होणार असून या स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी अध्यक्ष प्रमोद गोणबरे , कार्यकारणी सदस्य श्री. नरेश निमूणकर , तुषार पेढे , दिनेश महाडीक , मकरंद पवार , रोहन पवार , अजित रेपाळ , जय काजरोळकर , उमेश पवार , सत्यम गुरसळे , प्रथमेश निमूणकर , तेजस पागडे आदी कार्यकर्ते विशेष मेहनत घेत आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here