U
रत्नागिरी – रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भात वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री अमित देशमुख यांनी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदयजी सामंत, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्रयाचे लोकप्रिय खासदार मा.श्री. विनायकजी राऊत व रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी खासदार विनायक राऊत यांनी सांगितले कोकणात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात यावे ही अनेक वर्षापासूनची मागणी आहे. महाविद्यालयासाठी आवश्यक असणारी जागा निश्चित करुन भारतीय आयुर्विज्ञान परिषद / राष्ट्रीय वैद्यक परिषद यांच्या मानकानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय निर्माण करण्याच्या दृष्टीने शासन/केंद्र शासनाकडे पाठपुरावा करुन जागा हस्तांतरण करणे, आरोग्यसेवे बरोबर करावयाचा सामजस्यं करार करणे इ.करिता कामे शिघ्र गतीने होण्याकरिता डॉ. शैलेंद्र जाधव, विभागप्रमुख प्राध्यापक शरिररचनाशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर यांची जिल्हा सामान्य रुग्णालय, रत्नागिरी येथे प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकरिता निर्माण करण्यात आलेल्या कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी 23 पासून प्रभारी अधिष्ठाता म्हणून नियुक्त करण्यात आली आहे.