खेड – खेड तालुक्यातील घरडा कोविड सेंटरमध्ये आता लक्षवेधी सुधारणा झाल्याची माहिती कोविड सेंटच्याकारभाराचे पितळ उघडे पाडणाऱ्या २९ जणांच्या प्रतिनिधीने आज प्रगती टाइम्स बरोबर बोलताना दिली.
घरडा कोविड सेंटर मध्ये अंनागोदी कारभाराबद्दल कोविड सेंटर मध्ये पॉझिटिव्ह म्हणून उपचार घेणाऱ्या २९ जणांनी २१सप्टेंबर रोजी कर्मचारी संघटने कडे पाठपुरावा करून जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या कडे कोविड सेंटरमध्येच स्वाक्षरी मोहीम घेऊन निवेदन सादर केले होते या निवेदनाच्या प्रती संबंधित विभागाकडे पाठविण्यात आल्या होत्या.
प्रगती टाइम्स ने या अंनागोदी कारभाराची दखल घेत करपलेल्या जळालेल्या तसेच कंच्या चपात्या सहित सविस्तर वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.
काल या २९जनांपैकी काहींची याबाबत प्रशासनाच्या वतीने विचारपूस करण्यात आली यावेळी या कारभाराची मिळत असलेल्या जेवण आणि स्वछते बाबत सगळ्यांनी पाढा वाचला मात्र यानंतर यामध्ये कमालीची सुधारणा झाली असून काही साहित्य आता बाहेर पडले आहे तसेच जेवण ही दर्जा सुधारला असल्याची माहिती संबधीत तक्रार देणाऱ्यांनी आज प्रगती टाइम्सशी बोलताना दिली प्रगती टाइम्स च्या सडेतोड लेखणीमुळे त्यांनी आभार मानले.