‘
चिपळूण – रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात अनेक कंपन्यांनी गुंतवणूक केली आणि अनेक कंपन्यांनी चिपळूण वासियांना गंडा घातलाय तसाच पुन्हा एकदा गंडा घातलाय तो ‘कलकाम’ रीयल इन्फ्रा (इं) लिमिटेड या इन्वेस्टमेंट या कंपनीने रत्नागिरी जिल्ह्यातील ६ हजार ग्राहकांचे बत्तीस कोटी रुपये घेऊन या ठिकाणाहून फरार झालेली आहे. या कंपनीने आपले चिपळूणमधील कार्यालय बंद केल असून कंपनीचे संचालक मंडळ आणि मालक 2017 पासून आम्ही आपले पैसे देतो असे सांगून टोलवा-टोलवी करत असल्याने अखेर या कंपनीच्या ग्राहकांनी आज चिपळूण पोलीस स्थानकात त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून आमचे पैसे जर आम्हाला मिळाले नाहीत तर 15 ऑगस्ट रोजी उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
2012 साली या कंपनीने आपलं बस्तान चिपळूण मध्ये मांडलं. त्यानंतर पहिली पाच वर्ष या कंपनीने आपल्या ग्राहकांना आमिष दाखवत परतफेड केली. आणि याच आमिषाला बळी पडला तो कोकणातील ग्राहक या ग्राहकांनी नंतर या कंपनीत करोडो रुपये गुंतवले मात्र या कंपनीने 2017 पासून पुढे आपल्या ग्राहकांना पैसे देण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. तसेच कंपनीचे चिपळूण येथील कार्यालय सुद्धा ग्राहकांना पैसे मिळत नसल्याने बंद झाले. याच वेळी चिपळूणातील या कंपनीचे काही एजंट आणि ग्राहकाने या कंपनीच्या मुंबई येथील कार्यालयात संपर्क साधला त्यावेळी आम्ही तुम्हाला पैसे देतो असे सांगून आजपर्यंत उडवाउडवीची उत्तरे देण्यात आले. या कंपनीने काही जणांना 5 लाख,10 लाख ,दोन लाख असे चेक दिले ते चेक ही अध्याप तसेच आहेत. त्यामुळे या कंपनीवर कायदेशीर कारवाई करून आम्हाला आर्थिक अडचणीतून दूर करावं या मागणीसाठी एजंट व ग्राहक स्वातंत्र्यदिनी चिपळूण तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत, अशी माहिती नवनीत जाधव, मानाजी आयरे, संतोष भाटकर, माधवी भोसले, स्नेहा कदम यांनी आज सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
