गुहागर – गुहागर तालुक्यातील अडूर येथील दुकान चोरी प्रकरणी गुहागर पोलिसांनी दोन संशयित आरोपींच्या अवघ्या ३६ तासात मुसक्या आवळल्या आहे.
दोन दिवसांपूर्वी या चोरट्यांनी अडुर येथील गणेश पान शॉप या किराणामालाच्या दुकानाचा मागील दरवाजा फोडून आत प्रवेश करीत १४ हजाराची रोख रक्कम लांबवली होती. तसेच येथून जवळचा असणाऱ्या आरडीसीसी बँकेच्या दरवाजाचे कुलूप तोडून सीसीटीव्ही वायरिंग कट करून चोरीचा प्रयत्न केला तर थोड्या अंतरावर असणाऱ्या सोनाराच्या दुकानावर देखील डल्ला मारण्याचा प्रयत्न या चोरट्यांनी केला होता. चोरीची हि घटना ७ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली होती. गुहागर पोलीसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत या चोरीतील दोन संशयितांच्या मुसक्या अवघ्या 36 तासातआवळल्या आहेत.याप्रकरणी गुहागर पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली त्यामुळे गुहागर पोलिसांचे कौतुक होत आहे.
गुहागर तालुक्यातील पालशेत वेळणेश्वर या भागात ज्या चोरी झाल्या होत्या यांची पद्धत आणि अडूर येथे झालेल्या चोरीची पद्धत एकच होती. त्यामुळे गुहागर पोलिस स्टेशनचे राजू कांबळे यांनी एका ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन सतरा सेकंदाच्या सीसीटीवी फुटेज मधल्या त्या दोघांना ओळखून या दोन चोरांना पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली त्यामुळे राजू कांबळे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.