बातम्या शेअर करा

रत्नागिरी – रात्री उशिरा प्राप्त अहवालात रत्नागिरी जिल्ह्यात 48 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 2064 झाली आहे.तर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात आज कोरोनाने 3 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील मृतांची संख्या 71 झाली आहे. या मृतांमध्ये राजापूर तालुक्यातील नाटे गावातील 60 वर्षीय महिला रुग्ण तसेच राजापूर तालुक्यातील पाचल येथील एक महिला रुग्ण आणि राजिवडा, रत्नागिरी येथील एक 60 वर्षीय पुरुष रुग्ण यांचा मृतांमध्ये समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील तालुकानिहाय मृतांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. रत्नागिरी -19, खेड -6, गुहागर- 2, दापोली -14, चिपळूण- 13, संगमेश्वर -7, लांजा -2, राजापूर -7, मंडणगड- 1.एवढी संख्या आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here