खेड – खेड तालुक्यातील घरडा कोव्हिड केअर सेंटरमध्ये आज एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सकाळी नेहमीप्रमाणे आयसोलेशन वॉर्डमधील कोरोनाग्रस्त रुग्णांना अल्पोपहार देण्यात आला. मात्र त्यामध्ये चक्क मेलेले झुरळ आढळल्याने रुग्णांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.
घरडा कोव्हिड केअर सेंटरमध्ये 73 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांना आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे अल्पोपहार म्हणून उपमा देण्यात आला. त्यातील एका रुग्णाला त्या उपम्यात मेलेले झुरळ आढळल्याने रुग्णांनी तेथील डॉक्टर यांच्याकडे तक्रार केली. हा प्रकार सोशल मीडियावरून समोर आल्यानंतर प्रशासनाने याची दखल घेत उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सकाळचा आलेला अल्पोपहार पुन्हा पाठवून नवीन अल्पोपहार देण्यात आला मात्र या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात आला.