मुंबई – गणेश उत्सवात कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने सेवा अखेर एसटी सेवा सुरू करण्यात आली आहे.
मुंबई मधील परळ, कुर्ला, मुंबई सेंट्रल या बसस्थानकावरून दि. ५ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट या दरम्यान ग्रुप बुकिंग आणि मागेल त्याला एसटी ही योजना सुरू करण्यात आली असून एसटी महामंडळाच्या वतीने मागेल त्या गावाला एसटी देण्यास सुरुवात झाली आहे. एका एसटीमध्ये २२ प्रवासी क्षमता, संगणकीय आरक्षण, समूह आरक्षण ही सेवा सुरू आहे.