रत्नागिरी – सेवानिवृत्त नंतर सुधा आपण आपण समाज्याचे काहीतरी देणं लागतो याचं भावनेतून त्यांनी पुन्हा सेवा करायला सुरुवात केली त्यावेळी त्यांनी ४२ चिमुकल्यांवर यशस्वी उपचार करून त्यांना कोरोनाच्या विळख्यातून सोडवणारे असे बालरोगतज्ज्ञ डॉ दिलीप मोरे यांचे आज कोरोनामुळे निधन झाले.
गोरगरिबांचे डॉक्टर म्हणून त्यांची ओळख होती. ६५ व्या वर्षी त्यांनी आपली सेवा थांबवण्याचा निर्णय घेतला आणि त्याच दिवशी त्यांना कोरोनाने वेढले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. या उपचारांना त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद देखील मिळत होता मात्र आज सकाळी ही दुःखद वार्ता कानी आली. आयुष्यभर ज्याने रुग्णांची फक्त सेवा केली अशा डॉक्टरांच्या जाण्याने समाजात हळहळ व्यक्त होत आहे.