मार्गताम्हणे – गुहागर चिपळूण मार्गावरील मार्गताम्हणे येथे गुहागर आगारातील चालक वाहक हे दारूच्या नशेत आढळून आल्याने स्थानिक ग्रामस्थांनी पुढाकार घेत बस मधील सर्व प्रवाशांना उतरवून घेतले आणि सदरील बस अडकवून ठेवली मात्र त्याचवेळी चालक व वाहकाने ती बस चिपळूणकडे रिकामी पळवून नेली. हा प्रकार उघडकीस होताच सर्वत्र संताप आणि नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
गुहागर बस क्रमांक MH20 BL 1542 ही गाडी चिपळूण निघालेली असताना या एसटी बस मधील चालक आणि वाहक हे दोघेही दारूच्या नशेत असल्याचे काही प्रवाशांच्या लक्षात आले. त्याचवेळी ही बस मार्ग ताम्हणे येथे आले असता त्या बसमधील काही प्रवाशांनी स्थानिक ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली. बस मधील स्थिती पाहताच स्थानिक ग्रामस्थांनी बसमधील सर्व ग्रामस्थांना उतरवून बस थांबून ठेवली होती. मात्र सर्व ग्रामस्थ एसटी बस मधून उतरताच चालक वाहकाने रिकामी बस चिपळूणकडे पळून गेली. त्यानंतर काही वेळातच चालक आणि वाहक दारूच्या नशेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तर काहीजणांनी याबाबतची माहिती गुहागरचे आगार प्रमुख यांना फोनवरून दिली. आता हे चालक वाहक दारूच्या नशेत चिपळूण बस स्थानकांवर गेल्यावर त्यांची चौकशी होणार का.? आता या चालक वाहकांवर एसटी प्रशासन नक्की कोणती कारवाई करणार याची चर्चा सध्या संपूर्ण नाक्या नाक्यावर सुरू आहे.















