चिपळूण – ( ओमकार रेळेकर )- शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक भारतीच्या राज्य संघटनेचे राज्यभर आंदोलनात्मक कार्यक्रम सुरू आहे याचाच एक भाग म्हणून राज्यातील सर्व आमदारांना शिक्षक भारतीच्या वतीने निवेदन देऊन सदर मसुदा रद्द करण्याची विनंती केली जात आहे.
त्याच आदेशाने आज गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांची चिपळूण येथे भेट घेऊन जुन्या पेन्शन योजना नाकारणारा दि 10 जुलैचा मसुदा रद्द करावा व सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी या मागणीसाठी शिक्षक भारती संघटनेचे कार्यकर्ते यांनी आज भेट घेतली.यावेळी या मागणीला भास्कर जाधव यांनी पाठिंबा देवून दि १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी पुढील कारवाई करण्याची ग्वाही दिली. व
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मसुदा रद्द करण्याबाबत तात्काळ पत्र ही दिले व त्या पत्राची प्रत देखील संघटनेला सादर केली.
यावेळी रत्नागिरी शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष जाधव चिपळूण तालुका अध्यक्ष शिवाजी शिंदे ,राजेश माळी ,खंडू नवले , लक्ष्मण गावित , भाऊ कांबळे आणि इतर शिक्षक मान्यवर उपस्थित होते.