मुंबई – मुंबई कोकणात ,मध्यमहाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर पुढील २४ तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. जुलैमध्ये हरवलेला पाऊस आता परतणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाची दमदार एन्ट्री होईल असा अंदाज हवामानखात्याकडून वर्तवण्यात येतोय. या पार्श्वभूमीवर पुढील २४ तासांमध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. पुढील दोन दिवसात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. परिणामी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय