गुहागर – गुहागर तालुक्यातील झोंबडी ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच अतुल लांजेकर यांच्यावर दाखल केलेला अविश्वास ठराव ना मंजूर झाला असून अतुल लांजेकर यांनी हा ठराव जिंकला आहे. त्यामुळे त्यांचे सरपंचपद अबाधित राहिले आहे.

गुहागर ; या गावच्या सरपंचाच्या विरोधात अविश्वादर्शक ठराव दाखल
झोंबडी ग्रामपंचायत मध्ये लोकनियुक्त सरपंच अतुल लांजेकर यांच्या विरोधात पाच सदस्यांनी हा अविश्वास ठराव दाखल केला होता. यामध्ये ग्रामपंचायतीच्या विकास कामात झालेले गैरव्यवहार ग्रामपंचायत सदस्यांना आर्थिक आणि इतर व्यवहारात विश्वासात न घेता सरपंचाचा एकतर्फी मनमानी कारभार असे अनेक आरोप या पाच सदस्यांनी केले होते. याच ठरावावर आज झोंबडी ग्रामपंचायत मध्ये तहसीलदार परीक्षित पाटील यांच्या समक्ष या ठरावासाठी मतदान करण्यात आले. या ठरावाच्या बाजूने पाच सदस्यांपैकी चार सदस्यांनी मतदान केले. तर एक सदस्य हा अपात्र ठरला. त्यामुळे लोकनियुक्त सरपंच अतुल लांजेकर यांचे सरपंचपद अबाधित राहिले. यावेळी ज्या पाच सदस्यांनी हा अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यातील त्यातील पाच पैकी तीन सदस्यांनी स्वतःच्याच दाखल केलेल्या अविश्वास ठरावाच्या विरोधात मतदान करून अतुल लांजेकर यांच्या बाजूने मतदान केले. यामध्ये उपसरपंच प्रणाली पवार, ग्रामपंचायत सदस्य मयुरी लांजेकर, जैनाब ममतुले यांनी पुन्हा एकदा सरपंच अतुल लांजेकर यांच्यावर विश्वास दाखवत त्यांच्या बाजूने मतदान केले. तर अफजल ममतुले हे आपल्या दाखल केलेल्या अविश्वास ठरावावर ठाम राहत सरपंच अतुल लांजेकर यांच्या विरोधात मतदान केले. मात्र सात सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये या आधीच दोन पद रिक्त होती तर एक पद दोन दिवसांपूर्वीच अपात्र करण्यात आलं होतं. त्यामुळे उरलेल्या चार सदस्यांमध्ये हा अविश्वास ठराव घेण्यात आला. यामध्ये अतुल लांजेकर यांनी आपल्या वर्चस्व कायम राखत आपलं सरपंच पद कायम ठेवल.