दिवाळीनिमित्त पनवेल – चिपळूण दरम्यान २४ रेल्वेगाड्या धावणार

0
60
बातम्या शेअर करा

चिपळूण – दिवाळीनिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे मार्गावरून ३० अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. यापैकी पनवेल – चिपळूण दरम्यान २४ रेल्वेगाड्या आणि लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव दरम्यान ६ रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत.

गाडी क्रमांक ०११५९ अनारक्षित पनवेल – चिपळूण विशेष रेल्वेगाडी ३ ते २६ ऑक्टोबरदरम्यान प्रत्येक शुक्रवार, शनिवार व रविवारी पनवेल येथून दुपारी ४.४० वाजता सुटेल आणि चिपळूण येथे त्याच दिवशी रात्री ९.५५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११६० अनारक्षित चिपळूण – पनवेल विशेष रेल्वेगाडी ३ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबरदरम्यान प्रत्येक शुक्रवार, शनिवार व रविवारी चिपळूण येथून सकाळी ११.०५ वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी दुपारी ४.१० वाजता पोहोचेल. या विशेष रेल्वेगाडीला सोमाटणे, आपटा, जिते, पेण, कासु, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजनी या स्थानकात थांबेल. या रेल्वेगाडीला ८ मेमू डबे असतील.

गाडी क्रमांक ०१००३ लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी ६ ते २० ऑक्टोबरदरम्यान दर सोमवारी म्हणजे ६ , १३ आणि २० ऑक्टोबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी ८.२० वाजता सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी रात्री १०.४० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१००४ मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी ५ ते १९ ऑक्टोबरदरम्यान दर रविवारी म्हणजे ५, १२ आणि १९ रोजी मडगाव येथून दुपारी ४.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे सकाळी ६.२० वाजता पोहोचेल.

या रेल्वेगाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी येथे थांबा असेल.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here