गुहागर ; मोहल्यातील ती बेवारस वस्तू म्हणजे……..?

0
752
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यातील झोंबडी मोहल्ला येथील मशिदीसमोर एक बेवारस बॉक्स सापडल्याचं वृत्त प्रगती टाइम्सने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर स्थानिक प्रशासन पोलीस आणि ग्रामस्थांच्या मदतीने त्याचा शोध घेतला असता तो बेवारस बॉक्स म्हणजे ग्रामस्थांच्या सोयीसाठी दोन वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीने खरेदी केलेला डेड बॉडी फ्रिज असल्याचे उघड झाले आहे.

झोंबडी येथील ग्रामपंचायत मध्ये काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेऊन या ग्रामपंचायत मधील सरपंच व ग्रामसेवकांनी मिळून केलेला घोटाळा उघड केला होता. याच घोटाळ्यामध्ये एक लाख 17 हजार रुपये किमतीचा डेड बॉडी फ्रिज खरेदी करून सुद्धा जाग्यावर मिळत नसल्याने तो नक्की कुठे आहे.? किंवा त्या पैशाचं काय झालं? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. मात्र आता तो डेड बॉडी फ्रिज येथील मोहल्यातील मशिदीमध्ये काल आणून ठेवल्याचे उघड झाले. यावेळी याबाबत येतील ग्रामपंचायतीच्या कोणत्याही सदस्याला किंवा गावच्या अध्यक्षाला किंवा स्थानिक नागरिकांना माहिती नसल्याने ही वस्तू बेवारस असल्याची चर्चा गावात सुरू होती. त्यानंतर गावचे अध्यक्ष समीर तावडे व तंटामुक्ती अध्यक्ष सुलेमान ममतुले यांनी पोलिसांना संपर्क साधून याबाबत तक्रार केली होती. स्थानिक पोलिसांनी याबाबत तपास करून हा त्या ग्रामपंचायतीमधीलच डेड बॉडी फ्रिज असल्याचं उघड झाले.

दोन वर्षांपूर्वी खरेदी केलेला मात्र जाग्यावर उपलब्ध नसलेला हा डेड बॉडी फ्रिज या ठिकाणी कोणी आणला.? जर ठेकेदाराने हा फ्रिज आणला असेल तर तो आधी कुठे होता ? ग्रामपंचायत मधील घोटाळा स्थानिक ग्रामस्थांनी उघडकीस आल्यानंतरच तो डेड बॉडी फ्रिज का आणण्यात आला.? आता ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीमध्ये ग्रामसेवक आणि सरपंच यांच्यावर स्थानिक प्रशासन नक्की कारवाई करणार का ? की त्यांना पाठीशी घालणार असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित राहिले आहेत. कारण ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीनंतरही अद्यापही या घोटाळ्याची चौकशी सुरू न झाल्याने… दया कुछ तो गडबड आहे. अशी चर्चा सध्या या परिसरात सुरू आहे.

गुहागर ; या गावात आढळला बेवारस बॉक्स.. चर्चेला उधान..?

https://youtube.com/shorts/94Pd0aJ2TUw?si=vQYiPtsnC6gZL3JM


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here