गुहागर – गुहागर तालुक्यातील झोंबडी मोहल्ला येते बेवारस बॉक्स आढळल्याने या परिसरात एकच खळबळ माजली आहे. या बॉक्स बाबत सध्या गावांमधील प्रतिष्ठित नागरिकांना किंवा गावचे अध्यक्ष समीर तावडे व तंटामुक्ती अध्यक्ष सुलेमान ममतुले यांना कोणतीच माहिती नसल्याने हा बॉक्स नक्की कशासाठी आणला आहे.? या बॉक्समध्ये नक्की काय आहे..? याची चर्चा संपूर्ण झोंबडी परिसरासह तालुक्यात सुरू तालुक्यात सुरू आहे. झोंबडी गावचे अध्यक्ष समीर तावडे व झोंबडी तंटामुक्तीचे अध्यक्ष सुलेमान मुमतुले यांनी पोलिसांशी संपर्क साधला आहे. या बॉक्समध्ये नक्की काय आहे. हे पोलीस आल्यावरच समजेल. सध्या तरी या परिसरात एकच खळबळ माजली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.