चिपळूण ; तुरंबवचे रस्ते तात्काळ खुले करा, अन्यथा बोंबाबोंब आंदोलन – संदीप सावंत

0
278
बातम्या शेअर करा

चिपळूण- तुरंबवचे ग्रामदैवत आणि प्रसिद्ध देवस्थान असलेल्या शारदा देवीचा नवरात्रोउत्सव सुरू असताना आणि भाविकांची रीघ लागलेली असताना या मंदिराकडे जाणारे रस्ते प्रशासनाने बंद करून भाविकांना वेठीस धरण्याचे काम केले आहे.नियोजनाच्या नावाखाली ही शुद्ध अडवणूक असून तात्काळ सदरचे रस्ते खुले करावेत अन्यथा रस्त्यावर उतरून बोंबाबोंब आंदोलन करू असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप सावंत यांनी दिला आहे.तसे लेखी निवेदन त्यांनी प्रशासनाला दिले आहे.


चिपळूण तालुक्यातील तुरंबव येथील शारदा देवी मंदिराकडे जाण्यासाठी निवळी ते तुरंबव तसेच अबीटगाव-तुरंबव असे दोन रस्ते आहेत.या दोन्ही रस्त्यांचा वापर करून भाविक मंदिरात येत असतात.त्यामुळे दोन्ही रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते.दरम्यान आता नवरात्रोउत्सव सुरू असून त्यानिमित्ताने शारदा देवी मंदिरात मोठ्या संख्येने भाविक येत आहेत.परंतु प्रशासनाने नियोजनाच्या नावाखाली अडमुठी भूमिका घेऊन मंदिरात येणाऱ्या भाविकांना वेठीस धरण्याचे काम केले आहे.असे संदीप सावंत यांनी म्हटले आहे.
मंदिराकडे येण्यासाठी एक व जाण्यासाठी एक रस्ता असे नियोजन प्रशासनाने केले आहे.त्यामुळे भाविकांना सुमारे १५ ते १६ किलोमीटर वळसा घ्यावा लागत आहे.तसेच वाहतुकीची मोठी कोंडी देखील होत असून बाचाबाची व गोंधळ होत आहे.उत्सव काळात नियोजनाच्या नावाखाली प्रशासनाने अशी भूमिका घेणे चुकीचे असून भाविकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे प्रशासनाने तात्काळ रस्ते पूर्वीप्रमाणे खुले करून दोन्ही बाजूने वाहतूक सुरू करावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष संदीप सावंत यांनी केली आहे.
या संदर्भात संदीप सावंत यांनी जिल्हाधिकारी रत्नागिरी , पोलीस अधीक्षक रत्नागिरी, उपविभागीय पोलीस अधिकारी चिपळूण, तहसीलदार चिपळूण , पोलीस निरीक्षक सावर्डे यांना लेखी निवेदन दिले आहे.निवेदनात दोन्ही रस्ते तात्काळ खुले करावेत अन्यथा रस्त्यावर उतरून बोंबाबोंब आंदोलन सुरू करू असा गर्भित इशारा संदीप सावंत यांनी दिला आहे.त्यामुळे आता प्रशासनाच्या भूमिकेकडे समस्त भाविकांचे लक्ष लागले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here