मुंबई – गोवा महामार्गावर मिनी बस आणि कारचा अपघात

0
317
बातम्या शेअर करा

आरवली (जाकीर शेकासन): मुंबई -गोवा महामार्गावर आरवली जवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या मिनी बसने एका कारला धडक दिल्याने दोन महिलांसह दोन मुली जखमी झाले. मिनी बसचा चालक दारू प्यायला होता. अपघात होताच चालक आणि त्याचा सहकारी जंगलात पळून गेले. याच दरम्यान चिपळूण संगमेश्वरचे आमदार संगमेश्वरहुन सावर्डेकडे जात होते. त्यांनी थांबून जखमींना रुग्णवाहिकेतून डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.


याबाबत पोलिस आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी दिलेल्या माहितीवरून असे समजते की गुहागर येथील आयशर मिनीबस रत्नागिरी येथे प्रवासी सोडण्यासाठी गेली होती. प्रवासी सोडून या बसवरील चालक रवी अरुण झाल्टे हा आपल्या ताब्यातील मिनी बस घेऊन भरधाव वेगाने चालला होता. मुंबई गोवा महामार्गावरील आरवली येथील पेट्रोल पंपजवळ असलेल्या अवघड वळणावर चालकाचा बस वरील नियंत्रण सुटले. बस दुभाजकाला आढळून पेट्रोल पंपजवळ असलेल्या पंक्चर काढणाऱ्या दुकानात घुसली. याच वेळी पंक्चर काढण्यासाठी मारुती व्हॅगनआर कार थांबली होती. मिनी बसने या कारला भीषण धडक दिली. यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच कार मध्ये बसलेले आबोली कल्पेश घडशी ,
रुद्रा रुपेश घडशी , ऋग्वेद कल्पेश घडशी , कियारा रुपेश घडशी ३ हे जखमी झाले.
हे सर्व जण मुंबईहून गणपती सणासाठी आंबव पोंक्षे या आपल्या मुळगावी आले होते. आज हे सर्व आपल्या अंत्रवली येथील नातेवाईकाकडे गेले होते. कार पंक्चर झाल्याने ते पंक्चर काढण्यासाठी त्या ठिकाणी थांबले होते. अपघात होताच चालक रवी अरुण झाल्टे व त्याचा सहकारी जंगलात पळून गेले. मात्र चालकाचा परवाना बसमध्ये पडलेला मिळाला.
याच दरम्यान आमदार शेखर निकम हे महामार्गावरून जात होते. अपघात झाल्याचे दिसताच ते थांबले. जखमीना त्यांनी रुग्णवहीका उपलब्ध करून दिली तसेच जखमीना डेरवण येथे उपचारासाठी पाठविले. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई संपर्क प्रमुख घडशी यांना मोबाईलवरून कळवण्यात आले. तेही त्वरित अपघातस्थळी दाखल झाले. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघात झाल्याचे कळताच माखजनचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक विवेक साळवी, त्यांचे सहकारी पोलीस सोमनाथ खाडे घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here