वज्र्यमूठ दाखवा,जरांगेच्या पाठीशी उभे रहा; अखिल भारतीय मराठा संघाचे आवाहन

0
35
बातम्या शेअर करा


चिपळूण- मनोज जरांगे सारखा एक सामान्य शेतकरी वंचितासाठी लढतो आहे,स्वतःच्या जीवाची परवा न करता समाजासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहे.आता आपली जबाबदारी आहे.एकत्र या,वज्र्यमूठ तयार करा आणि मनोज जरांगे यांच्यापाठी खंबीर उभे रहा,आपल्या पुढच्या पिढीचे भविष्य सुरक्षित करायचे असेल तर हीच संधी आहे,गणरायाला वंदन करून बाहेर पडा आणि आंदोलनात सामील व्हा.असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संदीप सावंत यांनी केले आहे.आता थांबायचे नाय,लढायचे आहे,…..”आता नाही,तर कधीच नाही”हे लक्षात असुद्या,असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.


मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे सारखा एक समाज योद्धा रस्त्यावर उतरला आहे.अनेक अडचणी समोर येत आहेत.नव्हे तर मुद्दामहुन अडचणी निर्माण केले जात आहेत.
एक सामान्य शेतकरी असलेल्या मनोज जरांगे यांच्या विरोधात संपूर्ण सरकार आज उभे राहिले आहे.अरे जरा तरी लाज,शरम बाळगा,लाखो मराठे आज आपल्या न्यायहक्कासाठी मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत.ते फक्त मराठा समाजासाठी नव्हे तर मुस्लिम समाज,ख्रिश्चन,ब्राह्मण असे जे कोणी आरक्षणापासून वंचित राहिले आहेत त्यासर्वांसाठीचे हे आंदोलन आहे.प्रत्येक समाजाच्या शैक्षणिक,आर्थिक व रोजीरोटीसाठी हे आंदोलन आहे,हे लक्षात घेणे महत्वाचे आहे.आपल्या राष्ट्रगीतात”पंजाब, सिंधू,गुजरात, मराठा”असा जो उल्लेख केला गेला त्याचा पूर्ण अर्थ समजून घेण्यासाठीचा हा मोर्चा आहे.फक्त मराठा समाजाला आरक्षण मिळावे असा अर्थ या आंदोलनाचा न काढता हे वंचितांच्या भविष्यासाठीचे आंदोलन आहे हे समजून आता या आंदोलनात उतरावे लागेल.असेही संदीप सावंत यांनी स्पष्ट केले आहे.
हे कोणत्याही राजकीय पक्षाचे आंदोलन नाही किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी काही मिळावे म्हणून देखील नाही.वंचित असलेल्या सर्व समाजांना न्याय मिळावा म्हणून सुरू केलेली ही एक चळवळ असून मनोज जरांगे सारखा एक गरीब शेतकरी एक निमित्त मात्र ठरला आहे.त्यामुळे सर्व राजकीय पक्षांच्या कुबड्या बाजूला ठेवून या संघर्षात उतरण्याची ही वेळ आहे.गणेशोत्सव सुरू असताना लाखो मराठे आज कुटुंब,घरदार सोडून रस्त्यावर उतरले आहेत,त्यांचा आदर्श घ्या,तहानभूक विसरून ते कोणासाठी संघर्ष करत आहेत,?एकदा विचार करा आणि बेधडक या आंदोलनात उतरा, असे आवाहन संदीप सावंत यांनी केले आहे.
अखिल भारतीय मराठा महासंघाचा सक्रिय पाठिंबा मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला असून मराठा महासंघाचे अनेक सक्रिय कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी देखील झालेले आहे.आणि यापुढे देखील पूर्ण ताकदीने जरांगे पाटील यांच्या पाठी उभे राहण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.त्यामुळे आता उगाच डीवचण्याचा प्रयत्न कोणी करू नये,जाणूनबुजून अंगावर येण्याचा किंवा अंगावर पाठवण्याचा प्रयत्न केल्यास “लक्षात ठेवा…गाठ मराठ्यांशी आहे”फक्त शिंगावर घेणार नाही,तर मैदानात धूळ चारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,याची नोंद घ्यावी असा सज्जड इशारा संदीप सावंत यांनी दिला आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here