गुहागर- गुहागर येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले ज्ञानेश्वर चव्हाण हे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह मूळ गावी हिंगोली येथे गणपतीसाठी निघाले असताना अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. मात्र आता हे कुटुंब सातारा जिल्ह्यातील गोंदवले या ठिकाणी सुखरूप असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं.
हे शिक्षक कुटुंब बेपत्ता असल्याचे समजतात प्रगती टाइम्स ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर स्थानिक पोलीस प्रशासन व अनेक मित्रपरिवारांनी यांचा शोध घेण्याचे काम केले अखेर ते सातारा जिल्ह्यातील गोंदवले येथे सुखरूप असल्याचे समजले. तीन दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर आज (२८ ऑगस्ट) त्यांच्याशी संपर्क झाला आहे. कुटुंब सुरक्षित असल्याचे समजले असून, गावकऱ्यांसह नातेवाईकांनी दिलासा व्यक्त केला आहे. सातारा गोंदवले येथील गोंदवलेकर महाराजांच्या मठात आहेत असे सापडले आहे.या संपूर्ण घटनेमुळे परिसरात निर्माण झालेली चिंता आता निवळली असून, चव्हाण कुटुंब सुखरूप असल्याने आता सोशल मीडियावरील त्यांची शोध मोहीम थांबवावी असा आव्हान करण्यात येत आहे.