गुहागर – शिवसेना युवासेनेच्या वतीने गुहागर तालुका मर्यादित तालुकास्तरीय पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेची नाव नोंदणी दि. 26 /08/2025 या तारखेपर्यंत करावयाची आहे. तसेच सहभागी स्पर्धकांनी आपल्या घरातील सजावटीचा 2 मिनिटांचा व्हिडिओ काढून दि. 28/08/2025 रोजी दुपार पर्यंत संपर्क क्र. 8530143277 यावर पाठविणे अनिवार्य आहे. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी सागर गुजर, अमरदिप परचुरे चंद्रकांत लिंगायत यांच्याकडे संपर्क साधावा.
स्पर्धेसाठी प्रथम पारीतोषिक 11 हजार 111 रु. व सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक 7 हजार 777 रु. व सन्मानचिन्ह, तृतीय पारीतोषिक 5 हजार 555 रु. सन्मानचिन्ह, चतुर्थ पारीतोषिक 3 हजार 333 रु. सन्मानचिन्ह, पंचम पारीतोषिक 2 हजार 222 रु. सन्मानचिन्ह तसेच सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तरी या स्पर्धेत सर्वांनी भाग घ्यावा, असे आवाहन गुहागर विधानसभा समन्वयक विपुल लक्ष्मण कदम यांनी केले आहे.