खेड – मुंबईहून मालवणच्या दिशेने जाणाऱ्या एका खासगी आराम बसला अचानक आग लागल्याची घटना मध्यरात्री २:१० वाजता खेड तालुक्यातील कशेडी बोगद्यानजिकच्या सुरुवातीला असणाऱ्या पुलावर घडली. गाडीचा टायर फुटल्याने ही आग लागल्याचे प्रवाशांनी सांगितले. सर्व ४५ प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले .
या दुर्घटनेनंतर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती. यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या दुर्घटनेत एम एच ०२, एफजी २१२१ या क्रमांकाची खासगी आराम बस पूर्णपणे जळून खाक झाली असून प्रवाशांचे साहित्य देखील आगीत भस्मसात झाले. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती पोलिस घेत आहेत . गाडीतील सर्व प्रवासी सुखरूप असून, सामान मात्र पूर्णतः जळून खाक झाले.
















