कोकणवासियांसाठी ; पनवेल ते चिपळूण ६ अनारक्षित विशेष रेल्वे गाड्या

0
160
बातम्या शेअर करा

चिपळूण – कोकणात येणाऱ्या कोकणवासीयांसाठी पनवेल ते चिपळूण दरम्यान ६ अनारक्षित गणपती विशेष गाड्यांची घोषणाही मध्य रेल्वेने केली आहे.

गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे गाड्यांमध्ये वाढणारी भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन भाविक व प्रवाशांना अधिक सुलभ तसेच आरामदायक प्रवास मिळावा यासाठी भारतीय रेल्वेने यंदा विक्रमी ३८० गणपती विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आणखी २२ गाड्यांची वाढ केली आहे. गणेशोत्सव २७ ऑगस्ट पासून सुरू होणार असून ६ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. मात्र, गणेश फेस्टीव्हल स्पेशल ट्रेन २२ ऑगस्टपासूनच मुंबई, पुणे, कोकण, पनवेल, चिपळूनसह विविध भागांत धावत आहेत. त्यात पनवेल ते चिपळूण दरम्यान ६ अनारक्षित गणपती विशेष गाड्यांची घोषणाही मध्य रेल्वेने केली आहे.तिकिट काढण्यासाठी रेल्वे स्थानकावर तिकिट काउंटरवर जाऊन लांबच लांब रांगेत उभे राहण्याऐवजी मध्य रेल्वेने प्रवाशांना आणखी एक सुविधाजनक पर्याय दिला आहे. त्यानुसार, आता या गाड्यांमधील अनारक्षित डब्यांतील तिकिटे प्रवासी यूटीएस प्रणालीद्वारे काढू शकतात.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here