गुहागर ; 11 तासाने या रस्त्यावरील वाहतूक झाली पुन्हा सुरू

0
620
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यात गेल्या चार दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आज आबलोली तवसाळ रस्त्याला बसला या रस्त्यावर सिमेंट वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्याने या रस्त्यावरील वाहतूक तब्बल 11 तास बंद होती.

गेल्या चार दिवसापासून कोकणात सर्वत्र मुसळधार असा पाऊस पडतोय. पावसामुळे अनेक ठिकाणी जमीन ओलावा धरल्याने खचण्याचे प्रकारे घडत आहे. असाच काहीसा प्रकार आबलोली तवसाळ रस्त्यावर घडला. या रस्त्यावर कर्नाटक येथून तवसाळ कडे जाणारा सिमेंट टँकर हा साईड पट्टीवर उभा राहिला असता सदर रस्त्याची साडी पट्टी खचली आणि तो टँकर पलटी झाला त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक तब्बल 11 तास बंद होती. अखेर प्रशासनाने आणि स्थानिकांच्या मदतीने सदर टँकर बाजूला करून ही वाहतूक पूर्ववत करण्यात प्रशासनाला यश आले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here