या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला बेशुद्ध अवस्थेत आढळला काळा बिबट्या

0
441
बातम्या शेअर करा

देवरूख- रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख येथील पाटगाव येथे रस्त्याच्या बाजूला काळा बिबट्या निपचित पडलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. देवरूख परिसरात काळा बिबट्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. वनविभागाने या काळ्या बिबट्याला ताब्यात घेतले असून त्याला पुढील उपचारासाठी सातारा येथे पाठवण्यात आले आहे. या बिबट्याची तब्बेत हळूहळू बरी होत असल्याचे वनविभागामार्फत सांगण्यात आले आहे.

देवरुख- रत्नागिरी रस्त्याच्या बाजूला पाटगाव येथे काळा बिबट्या आढळून आला. त्याबाबतची माहिती पाटगाव ग्रामस्थ यांनी वनपाल संगमेश्वर देवरुख यांना दिली. त्यानंतर वनविभागाने त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता काळा बिबट्या निपचित पडलेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर डॉ. युवराज शेट्ये यांना बोलावून त्यांच्याकडून या बिबट्यावर वैद्यकीय तपासणी करून घेतली. उपासमारीमुळे सदरचा काळा बिबट्या हा निपचित पडला असले असे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.

बिबट्या नर जातीचा असून त्याचे वय अंदाजे एक वर्षे आहे. तसेच डॉक्टर संतोष वाळवेकर, वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी, कोल्हापूर वनविभाग, डॉ निखिल बनगर वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी सातारा वनविभाग सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कुंभार पशुपर्यवेक्षक कोल्हापूर यांचे मार्गदर्शनाखाली सदर बिबट्यावर वैद्यकीय उपचार चालू आहेत. यावेळी घटनास्थळी सहाय्यक वन संरक्षक रत्नागिरी चिपळूण प्रियंका लगड परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी प्रकाश सुतार, परिमंडळ वनअधिकारी ,संगमेश्वर देवरुख , न्हानू गावडे, वनरक्षक साखरपा सहयोग कराडे, वनरक्षक दाभोळे सुप्रिया काळे, वन्यजीव अभ्यासक प्रतिक मोरे ,डॉ सार्दुल केळकर, विराज आठल्ये , डॉ प्रितेश आढाव रा देवरूख हे उपस्थित होते.

बिबट्याची तब्येत बरी होत आहे परंतु आणखी काही दिवस उपचार करणे आवश्यक असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी यांचे मत असल्याने तसेच देवरुख किंवा रत्नागिरीमध्ये बिबट्या करिता वैद्यकीय सुविधा नसल्याने व सद्या जास्त प्रमाणात पाऊस पडत असल्याने वातावरण बदल होत आहे म्हणून मा मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर गुरुप्रसाद यांचे मार्गदर्शनाखाली बिबट्यावर उपचार करणे करीता सातारा वनविभाग मधील टिटिसी सेंटर सातारा येथे पाठविण्यात आले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here