गुहागर – गुहागर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाचं ठिकाण असणाऱ्या चिखली या गावच्या शिवसेना शाखाप्रमुखपदी मधुकर सावंत यांचे नियुक्ती करण्यात आली आहे.

मधुकर सावंत हे गेले अनेक वर्ष भास्कर जाधव यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात नुकतेच आमदार भास्कर जाधव यांनी प्रत्येक गावातील शाखाप्रमुखांची नियुक्ती केली त्यामध्ये चिखली या गावच्या शाखाप्रमुख पदी मधुकर सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मधुकर सावंत हे गेले अनेक वर्षांपासून या गावात सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय दृष्ट्या एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व मानले जातात. आगामी काळात आपण या गावात आमदार भास्कर जाधव यांनी केलेले विकास कामे प्रत्येक घराघरांमध्ये पोहोचवून शिवसेना वाढवणार असल्याचे मधुकर सावंत यांनी सांगितलं. त्यांच्या या निवडीमुळे त्यांच्यावर अभिनंदन आता वर्षाव करण्यात येत आहे.