चिपळूण – चिपळूण मधील सवतसडा धबधब्यावर थोड्या वेळापूर्वी एक दुर्घटना घडली आहे. धबधब्याचा आनंद घेण्यासाठी गेलेला एक तरुण पर्यटक पाण्यातून वाहून गेला आहे. राहुल लाल असे त्याचे नाव आहे. हा पर्यटक केरळ येथील असल्याचे समजते. गेले दोन दिवस चिपळूण मध्ये पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे नदी-नाले, धबधबे ओसंडून वाहत आहेत. आज स्वातंत्र्य दिन आहे. त्यामुळे सुट्टी एन्जॉय करण्यासाठी पर्यटक सवतसड्यावर गेले असताना ही दुर्घटना घडली. ही माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. तर एनडीआरएफची टीम वाहून गेलेल्या तरुणाचा शोध घेत आहे.