चिपळूण – जवळचे कार्यकर्ते पक्ष सोडून गेले आता अन्य ही काहीजण जाण्याच्या तयारीत आहेत,म्हणून आमदार भास्कर जाधव साहेब आता भावनिक खेळ करत आहेत,परंतु “जो बुंद से गयी,ओ हौद से नही आती” त्यामुळे आम.जाधवांनी आता भावनिक खेळ बंद करून आत्मचिंतन करावे,गेले ते सर्व स्वार्थी असे दाखवण्यापेक्षा आपण कुठे चुकलो,याचे आत्मपरीक्षण केल्यास ते पुढील वाटचालीस फायदेशीर ठरेल,असा खोचक सल्ला देखील संदीप सावंत यांनी दिला आहे.
पक्ष संघटना बळकट करा – आम. भास्कर जाधव यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
गुहागर मतदारसंघासाठी इच्छुक असलेले व त्यांचा हक्क असलेले तत्कालीन माजी जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी पक्ष सोडून बाजूला झाले, माजी तालुकाप्रमुख संदीप सावंत, माजी तालुकाप्रमुख विनोद झगडे, शरद शिगवण, शशिकांत मोदी, माजी जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर,महेश नाटेकर, सख्खे चुलत बंधू बाळ जाधव तसेच तीन माजी सभापती यांच्यासह कित्येक पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडला,ते का.?ते सर्व स्वार्थी होते का.?असा थेट प्रश्न संदीप सावंत यांनी उपस्थित केला आहे.शिवसैनिक हा स्वार्थी नसतो तर तो आत्मसन्मान व निष्ठेसाठी अहोरात्र काम करत असतो.पण येथे आत्मसन्मान सोडाच,उलट निष्ठवंतांना तुच्छतेची वागणूक दिली जात होती,प्रत्येक वेळी,प्रत्येक ठिकाणी टोले-टोमणे,अपमान व टार्गेट करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात होता.स्वतःच्या बगलबच्याना सन्मान,बाकीच्यांना अपमान,हाच एक कलमी कार्यक्रम राबवला जात होता.त्यामुळे अक्षरशः कंटाळून बाजूला जावे लागले.त्यामुळे स्वार्थी कोण हे आमदार जाधव साहेबांनी स्पष्ट करावे,असे थेट आव्हान संदीप सावंत यांनी दिले आहे.
५० हजाराच्या मताधिक्याने निवडून येण्याची वलग्ना करणारे चक्क दोन हजारावर कसे आले,?इतकी अधोगती का झाली.?नियती कोणाला सोडत नाही,हे आमदार जाधवांचेच वाक्य आज त्यांच्याच बाबतीत तंतोतंत खरे ठरताना दिसत आहे.त्याचे त्यांनी आत्मचिंतन व आत्मपरीक्षण करण्यापेक्षा जाणारे सर्व स्वार्थी,हा जावईशोध लावणे हसास्यपद आहे.तुमच्या बरोबर होते तो पर्यंत सर्व चांगले होते,पण बाजूला गेले तर लगेच स्वार्थी ठरले,पण ते का गेले,आपण कुठे चुकलो,हे जरा एकदा आपल्या मनाला प्रामाणिकपणे विचारल्यास सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील असे संदीप सावंत यांनी नमूद केले आहे.
ज्यांना आज स्वार्थी म्हणता तेच तुमच्यासाठी अहोरात्र झिजले,संघर्षाच्यावेळी तुमच्या पाठी ठाम उभे राहिले,अंगावर केसेस घेतल्या,विनाकारण दुष्मनी घेतली,शिव्याशाप घेतले,त्यामुळेच तुम्ही सलग निवडून येत होतात,याची जाणीव असायला हवी,त्यामुळे स्वार्थी ते नव्हे तर स्वार्थी तुम्ही होतात,आपला स्वार्थ साधण्यासाठी त्यांचा वापर करून घेत होतात हे सत्य स्वीकारावेच लागेल.माजी जी.प सदस्य नेत्रा ठाकूर व अन्य काही नी पक्ष सोडला,त्यामुळे आता त्यांच्यावर बोलण्यापेक्षा यापूर्वीच जे पक्ष सोडून गेले त्यांच्यावर का नाही व्यक्त झालात.?कारण तुमच्या जाचामुळे ते कंटाळून गेलेत हे तुम्हाला चांगले माहिती होते.असा चक्क आरसाच संदीप सावंत यांनी दाखवला आहे.आता अन्य काहीजण जाण्याच्या तयारीत आहेत,त्यामुळे आम.भास्कर जाधव भावनिक साद घालत आहेत.परंतु त्याचा काहीही उपयोग होणार नाही.हा भावनिक खेळ करण्यापेक्षा प्रामाणिकपणे आत्मचिंतन करण्याची ही वेळ आली आहे.वेळीच बोध घेतला नाही तर पुढची वाटचाल अवघड होईल, कारण नियती कोणालाच सोडत नाही…..साहेब अशी खोचक टिका संदीप सावंत यांनी केली आहे.