गुहागर – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री उदय सामंत, मंत्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत गुहागर तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांना शिंदे यांच्या शिवसेना प्रवेश केला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश कार्यक्रम आज खारवी समाज भवन, हेदवतड, हेदवी येथे मोठ्या संख्येत सपन्न झाला. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकूर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षा महेश नाटेकर, गुहागर पंचायत समिती माजी सभापती विलास वाघे, दत्ताराम निकम, पुनम पाष्टे, विभाग प्रमुख व माजी सरपंच समीर डिंगणकर, विनायक कांबळे, वेळणेश्वर माजी सरपंच नवनीत ठाकूर, हेदवी सरपंच आर्या मोरे, साखरीआगर सरपंच दुर्वा पाटील, पिंपर सरपंच अनिल घाणेकर, शीर सरपंच विजय धोपट, पाली सरपंच अरुण पेजले, पाभरे सरपंच सुभाष पाष्टे, चिंद्रावळे माजी सरपंच बबन ठीक, शीर माजी सरपंच लक्ष्मण आंबेकर, साखरी आगर माजी सरपंच विठोबा फणसकर, माजी सरपंच लक्ष्मण पावसकर, साखरी आगर मच्छीमार सोसायटीचे चेअरमन मारुती होडेकर, संपदा केळकर, तसेच अनेक उबाठाचे विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य त्याचप्रमाणे अनेक कार्यकर्ते, मुंबईतील कार्यकर्ते यांनी पक्षप्रवेश केला.यावेळी शिवसेना उपनेते व मा.आमदार .संजयराव कदम, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, गुहागर विधानसभा समन्वयक विपुल कदम, माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, तालुका प्रमुख दीपक कनगुटकर, पांडुरंग पाते, समीर डिगणकर, माजी सरपंच नवनीत ठाकूर, अमरदीप परचुरे, निलेश मोरे, रोहन भोसले उपस्थित होते.