बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यातील परचुरी या ठिकाणहून निघालेली परचुरी – चिपळूण ही एस.टी. बस आज सकाळी अपघातग्रस्त झाली. चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला कलंडली. या बसमध्ये अंदाजे ३० ते ३५ प्रवासी आणि विद्यार्थी होते. सुदैवाने बस रस्त्याच्या कडेला अडकली आणि मोठा अनर्थ टळला. कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.


या घटनेनंतर प्रवाशांना तातडीने सुरक्षित बाहेर काढण्यासाठी चालक व स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेत संकटमोचक भूमिका बजावली. बसमधील विद्यार्थी व प्रवासी अपघाताने घाबरले होते, मात्र स्थानिकांच्या तत्परतेमुळे सर्व प्रवासी सुखरूप बाहेर पडले.
अपघात घडून दोन तास उलटल्यानंतरही एस.टी. आगाराकडून कोणतीही मदत पोहोचलेली नव्हती. ग्रामस्थांनी संपर्क साधल्यावर “क्रेन पाठवली आहे”, “कोणीही जखमी झालेलं नाही म्हणून कोणी तिकडे गेला नाही” असे बेजबाबदार उत्तर एस.टी. प्रशासनाकडून देण्यात आले. या प्रकारामुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here