खेड ; रत्नागिरी जिल्ह्यातील खेड परिसरातील एका 22 वर्षे मुलीला एक अज्ञात आरोपी त्याच्या व्हॉटसअॅप मोबाईल वरून अश्लील मेसेज तसेच वारंवार फोन करून तिचा ऑनलाईन छुपा पाठलाग करत असे याबाबत खेड पोलीस स्थानकात तक्रार दाखल झाली होती. अखेर खेड पोलिसांना या आरोपीला मुंबई येथून अटक करण्यात यश आले आहेत.
व्हॉटसअॅप मोबाईल वरून अश्लील मेसेज तसेच वारंवार फोन करून बावीस वर्षे मुलीचा ऑनलाइन छुपा पाठलाग करत मुलीला अश्लील शिवीगाळ, व ठार मारण्याची धमकी देत हा आरोपी त्या त्रास देत होता. त्याचप्रमाणे त्या आरोपीने इंस्टाग्राम अॅप्लीकेशनचा वापर करून बनावट इंस्टाग्राम अकाऊंट काढले होते. त्यावरून त्या 22 वर्षे मुलीचे फोटो व्हायरल करून ब्लॅकमेल करत असे अखेर या सर्व बाबींना कंटाळून त्या पीडित मुलीने अज्ञात इसमाविरूध्द खेड पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी भागोजी औटी यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक नितीन भोवर यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी तात्काळ तपास पथक नेमुन या गुन्हयातील आरोपी याचा तांत्रिक व गोपनिय माहीतीच्या आधारे तपास करत असताना आरोपीत हा वसई मुबंई येथे असल्याचे निष्पन्न झाले त्या ठिकाणी त्वरित तपास पथक पाठवून आरोपी कृष्णकांत सुभाष वैध यास वसई मुबंई येथून ताब्यात घेवून त्याला अटक करण्यात आले.
ही धडक कामगीरी पोलीस निरीक्षक नितीन भोयर, यांच्या देखरेखीखाली दिपक गोरे, अजय कडू, राम नागुलवार, वैभव ओहोळ, रमिज शेख आदींनी पार पडली. सध्या त्यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे.















