मंडणगड – रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ येथे शेतजमिनीचा फेरफार बनवून घेण्यासाठी 30 हजाराची लाच घेताना रंगे हात पकडल्याने या परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी एकूण तीन जणांना ताब्यात घेण्यात आले असून अधिक तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी अधिकारी करत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदार यांनी त्यांचे पत्नीच्या नावे मंडणगड तालुक्यातील शेणाळे येथील त्यांच्या पत्नीच्या नावे लिलावामध्ये खरेदी केलेली शेत जमीन आहे. या जमिनीचा फेरफार नोंद करन तसा सातबारा उत्तारा संबंधीत मंडळ अधिकारी व तलाठी यांचेकडुन करन देतो असे सांगुण या कामाकरीता मारुती भोसले यांनी तक्रारदार यांचेकडुन ५०,०००/- रुपये रक्कमेची मागणी तक्रार देण्यापूर्वी केली होती त्यापैकी ४५,०००/-रुपये मारुती भोसले यांनी ऑनलाईन स्विकारले परंतु सदरची फेरफार नोंद मंडळ अधिकारी यांनी पूर्ण रक्कम न मिळाल्याने रदद केली. त्यानंतर तक्रारदार यांनी मंडळ अधिकारी अमित शिवगण, मंडळ अधिकारी म्हाप्रळ, यांची श्रीनिवास श्रीरामे, ग्राममहसुल अधिकारी सजा म्हाप्रळ अतिरिक्त कार्यभार सोवेली व मारुती भोसले शिपाई उपकोषागार कार्यालय, मंडणगड यांचे समक्ष भेट घेतली तेव्हा सदर फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी मंडळ अधिकारी अमित शिगवण यांनी तकारदार यांचेकडे प्रलंबित काम पुर्ण करून देण्यासाठी पडताळणी दरम्याने ३०,०००/- रुपये लाच रक्कमेची मागणी केली. याचवेळी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने आपला सापळा रचून तक्रारदार यांचेकडून ३०,०००/- रुपये लाच रक्कम पंचांसमक्ष स्विकारुन स्विकारलेल्या लाच रक्कमेतील स्वतःचा हिस्सा १५,५००/- स्वतःसाठी ठेवुन उर्वरीत १४.५००/-रुपयांचा हिस्सा तलाठी श्रीनिवास श्रीरामे यांना दिला म्हणुन तकादार यांचेकडुन लाच रक्कम स्विकारणारे मंडळ अधिकारी अभित शिगवण, ग्राम महसुल अधिकारी श्रीनिवास श्रीरामे व मारुती भोसले शिपाई उप कोषागार कार्यालय, मंडणगड यांना पंचासमक्ष ताब्यात घेण्यात आले आहे.
महसूल विभागामध्ये ही कारवाई झाल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. ही कारवाई शिवराज पाटील, पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्यूरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे. संजय गोवीलकर अपर पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्यूरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे, सुहास शिदि, अपर पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे, यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश पाटील, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत विभाग व त्यांच्या सहकार्याने केली.