चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सीईओ सौ. स्वप्ना यादव यांना ‘महिला प्रेरणा सन्मान’ पुरस्कार प्रदान

0
91
बातम्या शेअर करा

चिपळूण- भारतीय जनता पार्टी रत्नागिरी महिला मोर्चा चिपळूण वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्म सोहळ्यानिमित्त “महिला प्रेरणा सन्मान पुरस्कार” चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सीईओ, वाशिष्टी डेअरीच्या प्रवर्तक सौ. स्वप्ना प्रशांत यादव यांना सोमवार दि. २६ मे रोजी दुपारी ३ वाजता ब्राह्मण सहाय्यक संघ चिपळूण येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, सतीश मोरे, शहराध्यक्ष चिपळूण शहर मंडळ शशी मोदी, विनोद म्हस्के, महिला जिल्हा अध्यक्षा वर्षा ढेकणे, चित्राताई चव्हाण, स्नेहा मेस्त्री, इतिहासकार ज्योती तोरसकर, शीतल रानडे, सारिका भावे, प्रणाली सावर्डेकर उपस्थित होत्या.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here