संकेत लाड याची हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

0
120
बातम्या शेअर करा

देवरूख- पानिपत हरियाणा येथे ३ जून ते ६ जून २०२५ या कालावधीत होणाऱ्या ६ व्या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट फेडरेशन कप २०२५ या स्पर्धेसाठी संगमेश्वर तालुक्यातील तुळसणी गावचा सुपुत्र संकेत रामचंद्र लाड याची महाराष्ट्र राज्याच्या टेनिस क्रिकेट संघात निवड झाली आहे.

संकेत लाड याने कला शाखेतून बारावीपर्यतचे शिक्षण घेतले आहे. सध्या तो शेती हा वडिलोपार्जित व्यवसाय करत आहे. संकेत याला लहानपणापासूनच खेळाची आवड आहे. संकेत याचे दहावीपर्यंतचे शिक्षण लोक विद्यालय तुळसणी या शाळेतून झाले. बारावीचे शिक्षण आश्रम शाळा निवे बुद्रुक या महाविद्यालयातून झाले आहे. संकेत याचे आई वडील हे शेती व्यवसाय करुन आपला उदरनिर्वाह चालवतात. संकेत लाड याची महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here